प्रजासत्ताक दिन तिकीटे डिजिटल पेमेंटने मिळणार


मोदी सरकारने देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या अनेक योजनांनुसार यंदा प्रथमच २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन परेडची तिकीटे खरेदी करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा दिली जाणार आहे. दिल्लीच्या लुटियाना झोनमध्ये शनिवारपासून १० पेक्षा अधिक केंद्रांवर या परेडसाठी तिकीट विक्री सुरू झाली असली तरी डिजिटल पेमेंट सुविधेसाठी सेनाभवन, साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, जंतरमंतर, लाल किल्ला, इंडिया गेट येथे केंद्रे सुरू केली जात असल्याचे जाहीर केले गेले आहे.

प्रजासत्ताकदिन परेडची तिकीटे प्रेक्षक डेबिट क्रेडीट कार्डच्या सहाय्याने खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी नेमलेल्या कें द्रांवर स्वाईप मशीन्स पुरविली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment