तुमच्या कमांडनुसार चालणारा हुवेईचा मेट ९ स्मार्टफोन लाँच


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी हुवेईने त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन हुवेई मेट ९ नावाने लाँच केला असून सध्या या फोनची विक्री अमेरिकेत केली जात आहे. अमेझॉनचे अॅलिक्स प्रीलोड असलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे. हे फिचर युजर व्हाईस कमांडवर काम करते. त्यासाठी दोन व्हाईस कमांड देता येतात तसेच हा फोन वायफाय नेटवर्कच्या मदतीने घरातील अन्य गॅजेटनाही कनेक्ट करता येतो. कमांड देऊन युजर आवडीची गाणी, अलार्म, रेसिपीची माहिती, लाईट, तपमान नियंत्रण, हवामान माहिती, जगातील बातम्या अशी अनेक कामे करू शकतो.

या फोनसाठी ५.९ इंची २.५ डी ग्लास डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईड ७.० नगेट, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, ड्युअल रियर १२ व २० एमपीचे कॅमेरे, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, इन्फ्रारेड ब्लास्टर, फिंगरप्रिंट सेन्सर, फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह असलेली ४ हजार एमएएच बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. या फोनची किंमत ६०० डॉलर म्हणजे ४० हजार रु. आहे.

Leave a Comment