स्टेट बँकेपेक्षा स्वस्त झाले ‘या’बँकेचे गृहकर्ज


मुंबई -नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांना बँक ऑफ बडोदाने (बीओबी) खूशखबर दिली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. बॅंकेने स्वस्त व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.७ टक्क्याने कपात केली असून एसबीआयचा गृहकर्जाचा व्याजदर ८.५० टक्के आहे, तर बीओबीचा नवा व्याजदार ८.३५ टक्के आहे. अर्थात एसबीआयच्या तुलनेत बीओबीचे व्याजदर ०.१५ टक्क्याने स्वस्त असेल. आतापर्यंत मार्केटमध्ये एसबीआय स्वस्त गृहकर्ज देत होती. ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावर कर्जदारांची २४९६ रुपये प्रति महिना बचत होईल. ३० वर्षांच्या मुदतीतील कर्जात जवळपास ९ लाख रुपयांची बचत होणार आहे.