पहिलवान मुलींकडून हरण्यासाठी या जिममध्ये पुरूषांची असते गर्दी


जगभरात कुस्ती क्रिडा प्रकारात महिलांचा सहभाग लक्षणीय रित्या वाढला असतानाच लंडनमधील एक जिममध्ये महिला पहिलवानांबरोबर पुरूष पहिलवान कुस्ती खेळविली जाते व येथे पैसे भरून पुरूष पहिलवान मुलींकडून हारण्यासाठी प्रामुख्याने गर्दी करतात .विशेष म्हणजे मुलींकडून मार व मात खाण्यासाठी येणार्‍या पुरूष वर्गात १९ वर्षांच्या तरूणांपासून ते थेट ७० वर्षांपर्यंतचे आजोबा यांची गर्दी असते.

ही जिम पिप्पा नावाच्या महिलेच्या मालकीची असून ती स्वतः व्यावसायिक रेसलर आहे. ती सांगते माझा हा व्यवसाय वेगळा असला तरी मी तो गांभीर्याने करते व या व्यवसायाची वाढही वेगाने होत आहे. आमच्या कडे येणारे पुरूष ग्राहक कुस्ती खेळण्यासाठी त्यांच्या आवडीची रेसलर निवडू शकतात तसेच तिने कोणते कपडे घालावेत याचा चॉईस देऊ शकतात. येथे येणार्‍यात प्रामुख्याने मुलींकडून मार खाण्यात मजा घेणारे अधिक असतात तर कांही जणांना मुलींकडून हार स्वीकारण्यात मजा वाटते म्हणून येतात.

या कुस्तीसाठी एका सेशनला १५० पौंड म्हणजे १२५०० रूपये मोजावे लागतात व पुरूष वर्ग ही फी आनंदाने मोजतात असेही पिप्पा हिचे म्हणणे आहे.