१० वर्षाचा झाला अॅपलचा आयफोन


अॅपलने ९ जानेवारी २००७ साली आपला पहिला आयफोन लॉन्‍च केला होता. आज या फोनला लॉन्‍च होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. सन फ्रांसिस्‍कोमध्ये स्‍टीव जॉब्‍स यांनी जगासमोर पहिलावाहिला आयफोन सादर केला. पहिल्या आयफोनच्या लॉन्चिंगवेळी अॅपलने म्हटले होते की, हा फोन एक मोबाईल, आयपॉड आणि डेस्कटॉप यांचे संयुक्तस्वरूप असेल.

या फोनच्या लॉन्चिंगनंतर स्मार्टफोनच्या दुनियेत अनोखी क्रांती घडून आली आणि जगातील अनेक कंपन्या या अॅपलचा भागीदार होऊ लागल्या. नोव्हेंबर २००७मध्ये युके, जर्मनी आणि फ्रान्स मध्ये आयफोनची विक्री सुरु झाली. ऑगस्ट २००८मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोन लॉन्‍च करण्यात आला. या फोनला एअरटेल आणि वोडाफोनसोबत लॉन्‍च करण्यात आले होते. त्यावेळी ८जीबी मॉडेलची किमत ३१ हजार रूपये आणि १६जीबी मॉडेलची किमत ३६१०० रुपये होती. आयफोन लॉन्‍च केल्यानंतर २००७पर्यंत अॅपलमध्ये अॅप स्टोर सारखी सुविधा देण्यात आली नव्हती. आयफोनच्या पहिल्या अॅपचे नाव अॅप स्टोर असे होते. २०१६ने टाईम्स मासिकाने जगभरातील ५० प्रभावशाली गॅजेट्समध्ये अॅपलला सर्वात पुढचे स्थान दिले होते. जून २००७नंतर अमेरिकेच्या उत्पादनात अॅपलचे महत्वपूर्ण योगदान होते.

Leave a Comment