लवकरच उपलब्ध होणार स्वस्त स्मार्टफोन


नवी दिल्ली: कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या केंद्र सरकारने त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वदेशी मोबाईल संच उत्पादकांना स्वस्त स्मार्टफोन विकसित करण्याची सूचना केली आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणे शक्य होणाऱ्या य स्मार्टफोन्सची किंमत २ हजार रुपयांपेक्षाही स्वस्त असावी; अशी सरकारची अपेक्षा आहे. सर्वसामान्य; विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहार करणे सोपे व्हावे; हा यामागील उद्देश आहे.

भारतात लोकसंख्येच्या ८० टक्क्यांहून अधिक; अर्थात १०४ कोटीहून अधिक नागरीक मोबाईलधारक आहेत. मात्र त्यापैकी स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या केवळ ३० कोटींच्या दरम्यान आहे. स्मार्टफोन ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही; तोपर्यंत कॅशलेस व्यवहारांच्या योजनेला यश मिळणार नाही; याची जाणीव सरकारला आहे. त्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून मायक्रोमॅक्स, इंटेक्स, लावा, कार्बन अशा मोबाईल संचाचे उत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत या कंपन्यांना स्वस्त स्मार्ट फोन विकसित करण्याची सूचना करण्यात आली. चीनी मोबाईल उत्पादकांना या बैठकीपासून दार ठेवण्यात आले; तर सॅमसंग, ऍपल अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या बैठकीपासून दार राहणे पसंत केले.

सध्या बाजारपेठेत स्मार्टफोन अडीचहजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीला उपलब्ध आहेत. स्मार्ट फोनच्या अधिक किंमती आणि त्यामधील स्मार्ट सुविधांच्या वापराची आवश्यकता वाटत नसल्याने गरीब आणि ग्रामीण भागातील नागरीक स्मार्ट फोन वापरत नाहीत. मात्र या घटकांपर्यंत स्मार्टफोन पोहोचल्याशिवाय ‘कॅशलेस’ योजनेला यश येणार नसल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Leave a Comment