यंदाच्या वर्षी सूर्य आणि पृथ्वीजवळून जाणार लहानमोठे ५० धूमकेतू


मुंबई – एकूण ५० लहानमोठे धूमकेतू यंदाच्या वर्षी पृथ्वीजवळ येणार असून त्यापैकी अनेक धूमकेतू सूर्य प्रदक्षिणा करताना सूर्यावरच आदळतील. पृथ्वीच्या अगदी जवळून काही धूमकेतू जाण्याची शक्यता काही खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केली असली तरीही पृथ्वीला त्यापासून धोका नाही. मात्र, पुढील काळात मोठय़ा उल्कावर्षांवाची शक्यता आहे. यावर्षी येणाऱ्या ५० धूमकेतूंपैकी उC/201 UT NEOWISE, 45 P Honda-Mrkas-Pajdusakova, 2 P/Encke, 41 P/Tutle-Glakobini-Kresak, C/2015, V2(Jonson) हे केवळ ५ धूमकेतू आपल्याला साध्या डोळ्याने किंवा द्विनेत्रीने पहावयास मिळतील, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.

भारतीय खगोलप्रेमींसाठी चालू वर्ष फारसे उत्साहवर्धक नाही. कारण, यावर्षी खूप चांगली ग्रहणे आणि घडामोडी दिसणार नाहीत. मात्र, हौशी खगोलप्रेमींसाठी धूमकेतूंची मेजवानी राहणार आहे. सूर्य व पृथ्वीजवळ नवीन वर्षांत एकूण ५० लहानमोठे धूमकेतू येणार असून त्यातील अनेक नियमित नसून ते सूर्यावर आदळतील. काही धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जात असल्यामुळे काही वैज्ञानिकांनी ते पृथ्वीकडे येतील, असे भाकीत केले आहे. मात्र, तसे होणार नसल्याचे मत सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे. त्यातील ५ मोठे धूमकेतू हे पृथ्वीजवळून जाताना दिसणार आहेत. व्यावसायिक व हौशी खगोलप्रेमी ते दुर्बिणीने किंवा द्विनेत्रीने सहज पाहू शकतात आणि अभ्यास करू शकतात.

Leave a Comment