पीएनआर टाकताच मिळणार ट्रेनची संपूर्ण माहिती !


नवी दिल्ली : तुम्हाला आता रेल्वे तिकीटाचा पीएनआर चेक केल्यास संबंधित ट्रेनबाबतची बरीचशी माहिती एकत्रच मिनार आहे. ट्रेनला किती उशिरा आहे, ज्या ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करणार आहात, तिथून ती किती दूर आहे, ट्रेनचा स्पीड किती यासारखी माहिती मिळणार आहे.

याबाबत रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, रेल्वेचे सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर आयआरसीटीसी लवकरच नव्या सुविधेला सुरुवात होणार आहे. नुकत्याच रेल्वे मंत्रालयाच्या झालेल्या एका उच्चस्तरिय बैठकीत, प्रवाशांना पीएनआर चेक करतानाच ट्रेनबाबतची संपूर्ण माहिती देण्याचे निश्चित करण्यात आले.

तुम्हाला कोणकोणती माहिती मिळणार?
– ट्रेन किती उशिरा धावत आहे?
– ट्रेन किती वेगाने धावत आहे?
– नकाशावरील ट्रेनचे स्थान
– कोणत्या स्टेशनवर ट्रेन किती वेळात पोहोचणार?
– कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येत आहे?
– ट्रेनचे शेवटचे गंतव्य स्थान काय आहे?
– तुमचा कोच नंबर, कोचची कम्पोझिशन
– रस्त्यात काही बदल झाला तर त्याची माहिती

Leave a Comment