नोटबंदीबाबत उर्जित पटेल यांना नोटीस


नवी दिल्ली – संसदेच्या लोकलेखा समितीने रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांना नोटबंदीबाबत 20 जानेवारी रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली
आहे. तसेच समितीने त्यांच्याकडून 10 प्रश्‍नांची उत्तरे मागितली आहे. समितीने पटेल यांच्याकडून नोटबंदीच्या निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेच्या
भूमिका आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार्‍या परिणामाबाबत विचारणा केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केवी थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पटेल यांच्याकडे नोटबंदीबाबत विविध प्रश्‍नांची नियमावली पाठविली
आहे. यामध्ये नोटबंदीनंतर दोन महिन्यात वेळोवेळी नियम का बदलण्यात आले. आरबीआयने ही नियम कोणत्या आधारे बदलले आणि पैसे काढण्यावर कोणत्या नियमांतर्गत निर्बंध घालण्यात आले, याविषयी विचारणा करण्यात आली आहे. दरम्यान, लोकलेखा समितीकडून डिसेंबरमध्येच गर्व्हनर पटेल यांच्याकडून खुलासा मागविणार होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांची मुदत मागविली असल्याने त्यांना काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले होते.

लोकलेखा समितीने कोणते प्रश्न विचारले
– नोटबंदीचा निर्णय घेत असताना आरबीआयने सांगितले होते का की यामुळे 86% चलन रद्द होईल ? आरबीआय रद्द केलेल्या एवढ्या नोटा परत केव्हा चलनात आणेल ?
– कोणत्या कायद्यानुसार लोकांच्या रोख रक्कम काढण्यावर बंधन घालण्यात आले होते ? जर तुम्ही नियम सांगू शकत नसाल तुमच्यावर खटला का चालवला जाऊ नये ? आणि पदाचा दुरुपयोग केल्यामुळे तुम्हाला पदच्यूत का करण्यात येऊ नये?
– दोन महिन्यांमध्ये वारंवार नियम का बदल होते ? बोटांवर शाई लावण्याची कल्पना कोणत्या अधिकाऱ्याने दिली होती ? लग्न खर्चासाठी पैसे काढण्याचा आदेश कोणी तयार केला होता ? का हे सर्व सरकारने ठरविले होते ?
– किती चलन बंद करण्यात आले आणि रद्द करण्यात आलेल्या चलनापैकी किती जमा झाले आहे ? 8 नोव्हेंबरला आरबीआयने सरकारला नोटबंदीचा सल्ला दिला तेव्हा किती चलन परत येण्याची आपेक्षा होती ?
– 8 नोव्हेंबरच्या आरबीआयच्या आपतकालिन बैठकीसाठी सदस्यांना केव्हा नोटीस दिली गेली ? बैठकीला कोण-कोण उपस्थित होते ? बैठकीचा तपशील कुठे आहे ?
– केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की नोटबंदीचा निर्मय आरबीआय बोर्डने घेतला होता. सरकारने फक्त त्यांच्या सल्ल्यानुसार कारवाई केली. तुम्हाला हे मान्य आहे का ?
– जर निर्णय आरबीआयचा होता तर नोटबंदी भारताच्या फायद्याची आहे हे केव्हा ठरविले गेले ?
– एका रात्रीतून 500 – 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यामागे आरबीआयला कोणती मोठी समस्या वाटली होती ?
– देशात फक्त 500 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आहे. असे असताना सर्वात मोठे चलन 86% असताना ते बंद करण्याची अशी कोणती गरज निर्माण झाली होती ?

Leave a Comment