नोटबंदीपूर्वी जमा झालेल्या पैशांचा तपशील द्या


नवी दिल्ली – आयकर विभागाने तसेच पोलिसांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध ठिकाणी छापे टाकत अवैध रोकड जमा केल्या असून यासोबतच २.५० लाखांहून अधिक रुपयांची रोकड जमा झालेल्या बँक अकाऊंटसंदर्भात माहिती मागवली आहे. मात्र, पण आता आणखीन एक कठोर पाऊल आयकर विभागाने उचलले असुन नोटाबंदीपूर्वी बँकांमध्ये झालेल्या व्यवहारांची संपुर्ण माहिती मागविण्यात आली आहे.

नोटबंदीपूर्वी १ एप्रिल ते ९ नोव्हेंबर या कालावधीत बँक अकाऊंटमध्ये जमा झालेल्या रोख रक्कमेचा तपशील आयकर विभागाने सर्व बँकांकडे मागितला आहे. नोटाबंदीपूर्वी जर कुणी आपल्याला खात्यामध्ये अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल तर त्याची माहिती बॅंकांनी आयकर विभागाकडे सोपवावी असे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिले आहेत.

कुणाच्या नावावर हे बँक अकाऊंट आहे, त्यांचा पॅनकार्ड नंबर इत्यादी गोष्टीचीही माहिती सरकारने मागितली आहे. ज्या बँक अकाऊंट होल्डर्सने बँकेकडे आपला पॅनकार्ड नंबर तसेच फॉर्म ६० भरून दिलेला नाही अशा नागरिकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत याची पूर्तता करावी असे आयकर विभागाने म्हटले आहे.

अर्थमंत्रालयाने हा नवा आदेश आयकर नियम क्रमांक ११४ (ई) मध्ये बदलकरुन काढला आहे. यानुसार एखाद्या बँक खातेधारकाने पॅनकार्ड नंबर दिलेला नाही किंवा फॉर्म ६० भरून दिलेला नाही त्यांना तो तात्काळ द्यावा लागणार आहे. यापूर्वी आयकर विभागाने ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात जमा करण्यात आलेल्या पैशांची, बँक अकाऊंटची संपूर्ण माहिती द्या असा आदेश यापुर्वी काढण्यात आला होता. मात्र, आता १ एप्रिल ते ९ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्यात आलेल्या पैशांचा तपशील देण्यात यावा असा आदेश काढला आहे.

Leave a Comment