नोकिया सिक्स चीनमध्ये झाला लाँच


एचएमडीने नोकिया सिक्स स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत साधारण १६७०० रूपवये असून येत्या वर्षात आणखीही कांही नोकिया फोन बाजारात आणले जाणार आहेत. नोकिया सिक्स सध्या फक्त ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असून त्याला फ्रंट बटण जवळ फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

या फोनसाठी अँड्राईड ७.० नगेट ओएस, ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन,२.५ डी कर्व्ह ग्लास कोटिंग व गुरील्ला ग्लास प्रोटेक्शन थ्री दिले गेले आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १६ एमपीचा रियर ड्युअल टोन एलईडी फ्लॅश कॅमेरा एफ/२.० अपर्चरसह दिला गेला आहे. फेस डिटेक्शन ऑटो फोकस वाईड अँगल लेन्स, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ड्युअल स्पिकर्स अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. फोरजी, एलईटी, ब्ल्यू टूथ, जीपीएस, यूएसबी अशी कनेक्टिव्हीटी ऑप्शन आहेत. हा फोन जगातील अन्य देशांत कधी लाँच केला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment