करमणुकीवर बंदी असलेल्या सौदीत मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन


सौदी अरेबियाने देशाची गंभीर बनत चाललेली आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केवळ तेल उद्योगावर अवलंबून न राहता अन्य उद्येागांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार आता मनोरंजन उद्योग मजबूत करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे जाहीर केले गेले आहे. रूढीवादी इस्लाम देशांप्रमाणे सौदीतही संगीत ऐकणे, चित्रपट पाहण्यावर अनेक बंधने आहेत. त्यामुळे येथील नागरिक चित्रपट पाहण्यासाठी अथवा संगीत ऐकण्यासाठी बहारिन अथवा दुबई येथे जात होते. आता मात्र सरकारचा महसूल वाढावा म्हणून मनोरंजन उद्येागावरील बंधने शिथिल केली जात असल्याचे संकेत दिले जात आहेत.

सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यानी २०३० पर्यंत देशाच्या आर्थिक विकासाबाबतचा दृष्टीकोन आखला असून त्यानुसार यापुढे केवळ तेलावर हा देश महसुलासाठी अवलंबून राहणार नाही. त्या बरोबरीने नवीन उद्येागांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. महिलांचा कामातील सहभाग वाढविणे तसेच सरकारी सबसिडीला लगाम घालण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. येत्या तीन वर्षात म्हणजे २०२० पर्यंत देशात ४५० पेक्षा अधिक क्लब उघडले जाणार असून तेथे नागरिक मनोरंजनासाठी जाऊ शकतील. या इंडस्ट्रीमुळे १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment