इंडोनेशियातील सुंदर व भव्य बेसाखी हिंदू मंदिर


जगातील मोठा मुस्लीम देश म्हणून इंडोनेशियाचे नांव असले तरी या देशात हिंदू संस्कृतीच्या खुणा व भव्य अशी हिंदू मंदिरे यांची रेलचेल आहे. इंडोनेशियातील बाली बेटावर हिंदू संस्कृतीचे मोठ्या कसोशीने जतन केले गेले असून याच बेटावर जगातील अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आजही उभी आहेत. जगातील सर्वात मोठे व सुंदर असे बेसाखी मंदिर येथील अंगुग पहाडावर आजही नांदते गाजते असून हे मंदिर पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आवर्जून येत असतात. एखाद्या बेटाप्रमाणे वाटणारे हे मंदिर सर्वात विशाल पवित्र हिंदू मंदिर मानले जाते.


या मंदिरात अनेक हिंदू देवी देवतांच्या सुंदर मूर्ती आहेत तसेच हिंदू साधना केंद्र म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. येथे हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण अतिशय उत्साहात व परंपरेनुसार साजरे केले जातात. हे वासुकी नागाचे देऊळ आहे त्याची पूजा अर्चना मोठया भक्तीभावाने केली जाते. वासुकीचा अपभ्रंश बेसाखी असा झाला असल्याचे सांगितले जाते. वासुकी नागाचा उल्लेख अनेक हिंदू ग्रंथात व पुराणात आहे. असेही सांगतात की जावा भाषेत बेसाखीचा अर्थ बधाई असा आहे. मात्र त्याला सबळ पुरावा नाही कारण या मंदिरात असलेल्या मूर्ती, अन्य सजावट ही हिंदू परंपरेचे दर्शन घडविणारी आहे.

Leave a Comment