बेंटलीची कॉन्टिनेन्टल सुपरस्पोर्टस कार लाँच


ब्रिटीश लग्झरी कार्स उत्पादक कंपनी बेंटलीने त्यांच्या काँटिनेन्टल सिरीजमधील आत्तापर्यंतची सर्वात पॉवरफुल कार सादर केली आहे. दोन दरवाजे व चार सीट मॉडेलची कुपे व कन्व्हर्टिबल अशी दोन्ही व्हर्जन कंपनीने सादर केली आहेत.

या कारसाठी ६.० लिटर ट्विन टर्बो डब्ल्यू १२ इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग घेण्यास कुपे व्हर्जनला ३.५ सेकंद तर कन्व्हर्टिबल व्हर्जनला ३.९ सेकंद लागतात. या कार्सचा टॉप स्पीड अनुक्रमे ताशी ३३६ व ३३० किमी आहे. पॉवरफुल इंजिनमुळे ही जगातील फास्टेट फोर सीटर लग्झरी कार बनली आहे. कारची केबिन वेगळ्या धाटणीची असून तीन कलर कॉबिनेशन मध्ये कारचे डिझाईन केले गेले आहे. कारसाठी जादा क्षमतेचे टर्बोचार्जर व नवीन चार्ज एअरकूलिग सिस्टीम दिली गेली आहे. ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टीमसह असलेल्या या व्हर्जनना पर्सनलायझेशन ऑप्शन्सही आहेत. म्हणजे ग्राहकाच्या आवडीप्रमाणे कार्बन फायबर ट्रीम साईड पॅनल्स, इंजिन कव्हर, व्हील्ससाठी ग्लॉस फिनिश अशी ऑप्शन्स आहेत.