करणचा आपल्या ‘गे’पणावर मोठा खुलासा


आपल्या आत्मचरित्रातून प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यानेही त्याच्याबद्धल होणाऱ्या चर्चेला खूलासा करत उत्तर दिले असून अनेकदा दबक्या आवाजात करण जोहर गे असल्याबद्धल चर्चा होते. पण, पहिल्यांदाच करणने त्याबाबत जाहीर भाष्य केले आहे. त्याने आजवर कधीही उल्लेख न केलेल्या अनेक गोष्टींवर ‘द अनस्युटेबल बॉय’ या त्याच्या आत्मचरित्रात भाष्य केले आहे.

करण जोहरने आपल्याबाबत होणाऱ्या चर्चेबद्धल काहीतरी खूलासा करत किंवा प्रत्युत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला नाही. तर त्याने या गोष्टी थेट आपल्या आत्मचरित्रातच लिहील्यामुळे हे आत्मचरित्र जोरदार गाजले तर आश्चर्य वाटायला नको. करणने केवळ त्याच्या होमोसेक्सश्युल, बायोसेक्सश्युल असण्यावरच भाष्य केले नाही तर, सेक्स आणि त्या अनुशंघाने येणाऱ्या अनेक गोष्टींवर करण आपल्या आत्मचरित्रात बोलला आहे. दरम्यान, आजवर समोर न आलेल्या अनेक अनुभव आणि प्रसंगांची मेजवानीही करणने आपल्या आत्मचरित्रातून दिली आहे.

करण आपल्या आत्मचरित्रात लिहीतो, माझ्या सेक्सलाईफबद्धल अनेक लोक जाणून घेऊ इच्छीतात. पण, अशा लोकांना मला काही ओरडून सांगायची मला मुळीच आवश्यकता नाही. कारण मला माहित आहे, मी एका अशा देशात राहतो की जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरूंगाची हवा खावी लागू शकते. वयाच्या २६व्या वर्षीच माझी व्हर्जिनिटी गेली, हे सांगण्यात मला काही अभिमान वाटत नाही. हे सर्व न्यूयॉर्कमध्ये झाले होते. त्या वेळेपर्यंत मला सेक्सबद्दल काहीच अनुभव नव्हता, असे तो प्रांजळपणे आपल्या आत्मचरित्रात म्हणतो.

करण आपल्या आत्मचरित्रात पूढे लिहीतो की, तेव्हा मी बराच लहान होतो. त्या काळात मला सेक्सबद्धल फारसे माहित नव्हते. माझ्या वर्गातल्या एका मुलाने एकदा मला प्रश्न विचारला की, तुला ब्लो जॉब माहिती आहे का? त्यावेळी मी नाही असे उत्तर दिले. मला ब्लो जॉब काय असते हे माहीत नव्हते, मात्र मी त्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर त्या मुलाने मला स्वतःचे कपडे काढण्यास सांगून पंख्याचा स्पीड वाढवला, यालाच ब्लो जॉब म्हणतात, असे तो म्हणाला. त्यानंतर मी असे तीनदा केले. मात्र, मोठा झाल्यावर सेक्समध्ये फार काही अवघड नसल्याचे मला लक्षात आल्याचे करण जोहर आपल्या आत्मचरित्रात म्हणतो.

करणने आपल्या आत्मचरित्रात एक आठवणही सांगितली आहे. हा काळ कुछ कुछ होता है चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा आहे. तो म्हणतो की, हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर माझा खऱ्या अर्थाने सेक्सशी सामना झाला. पण, मी माझ्याबद्धल अनेकदा सेक्सबाबत अनेक अफवा ऐकतो. काहींनी तर शाहरूख खान आणि माझ्यात संबंध असल्याच्या अफवा पसरवल्या. पण, यातली खरी गोष्ट अशी की, शाहरुख खानला मी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानतो. त्या काळात आम्ही दोघे कोणत्या परिस्थीतीतून गेलो हे आम्हा दोघांनाच माहिती. मी होमोसेक्सश्युल, बायोसेक्सश्युल असलो तरी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही, असेही मोठ्या उद्वेगाने त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहीले आहे.