इंटेलने सादर केले फाईव्ह जी मोडेम


लासवेगास येथे सुरू असलेल्या सीईएस मध्ये इंटेलने फाइव्ह जी मोडेम सादर करून सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेण्यात यश मिळविले आहे. हे मोडेम मोबाईल, होम इंटरनेट राऊटर, कार, ड्रोन अशा ठिकाणी वापरता येणार आहे. इंटेल संगणक, सर्व्हर, मोबाईल्स साठी चिप बनविणारी जागतिक किर्तीची कंपनी आहे.

कंपनीच्या कार्पोरेट उपाध्यक्ष व महासंचालक अॅश इव्हान्स म्हणाल्या फाईव्ह जीच्या स्पीडमुळे आयुष्य जगण्याची पद्धत तसेच आयुष्याकडे पाहण्याची नजर पूर्णपणे बदलणार आहे. हे मोडेम इंडस्ट्रीसाठी मैलाचा दगड ठरेल. २०१६ मध्येच कंपनीने फाईव्ह जी मोबाईल ट्रायलसाठी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. सध्या फक्त चीन व अमेरिकेत फाईव्ह जी नेटवर्कची चर्चा जोरात असून चीनने १०० शहरात या नेटवर्कच्या ट्रायल सुरू असल्याचा दावा केला आहे. भारतात हे नेटवर्क २०१९ च्या सुमारास येईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment