होंडाची सेल्फ बॅलन्सिंग बाईक


लास वेगास येथील सीईएस मध्ये जगातील दिग्गज उत्पादन कंपन्या त्यांची उत्पादने सादर करत आहेत. आजपर्यंत येथे अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत आता या शो मध्ये दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनीही पाउल टाकले असून होंडाने त्यांची अत्याधुनिक बाईक येथे सादर केली आहे. रायडिंग असिस्टंट तंत्रज्ञानावरची ही पहिली बाईक असल्याचे सांगितले जात आहे. आजपर्यंत रायडिंग असिस्टंट तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या कार्स सादर केल्या गेल्या आहेत.

होंडाच्या बाईकमध्ये हे तंत्रज्ञान वापरले गेले आहे त्यामुळे बाईकला सेल्फ बॅलन्सिंग मिळते. म्हणजे बाईक उभी करताना तिला स्टँडची गरज अथवा चालकाने धरून ठेवण्याची गरज लागत नाही. हे तंत्रज्ञान कंपनीने होंडा युनिकम नावाने विकसित केले आहे. अर्थात कंपनीने या बाईक्सचे उत्पादन व्यावसायिक पातळीवर होणार का याचा खुलासा केलेला नाही मात्र कंपनीकडे हे तंत्रज्ञान असल्याने त्याचा वापर करून बाईक्स बाजारात येऊ शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment