स्टीकरनेही करता येणार स्मार्टफोन चार्ज


सध्या सुरू असलेल्या सीईएस शोमध्ये फ्रान्सच्या स्टार्टअपने विकसित केलेले विना तार चार्जिंग उपकरण लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या उपकरणात चार्जिग पॅड व स्टीकर आहेत. या उपकरणाच्या सहाय्याने वायरलेस चार्जिंगची सुविधा नसलेली कोणतीही इलेक्ट्राॅनिक उपकरणे चार्ज करता येणार आहेत. अगदी आयफोन सुद्धा. एनर्जी स्क्वेअर असे या चार्जरचे नाव आहे.

यात चार्जिंग पॅड व स्टीकर आहेत. त्यातील स्टीकर चार्ज करण्याच्या उपकरणाच्या मागे चिकटवायचा व तो चार्जिंग पॅडवर ठेवला की चार्जिंग सुरू होते. हा स्टीकर यूएसबी सी, मायक्रो यूएसबी, वा लायटनिगच्या दोन इलेक्ट्रोडला सपोर्ट करतो. मात्र नेहमीच्या मार्गाने उपकरणे चार्ज करायची असतील तर त्यासाठी स्टीकर काढून टाकावा लागतो. हा दोष उत्पादकांनी मान्य केला असून हा दोष लवकरच दूर केला जाईल असे स्पष्ट केले आहे. या उपकरणाची किंमत ८९ डॉलर्स असून त्यात चार्जिंग पॅड व पाच स्टीकर्सचा समावेश आहे.

Leave a Comment