नववर्षाच्या स्वागताला भारतीयांचे १४०० कोटी व्हॉट्सऍप मेसेजेस


नवी दिल्ली- भारतीयांनी नवीन वर्ष स्वागताचे मेसेजेस पाठविण्यासाठी व्हॉट्सऍपला सर्वाधिक पसंती दिली असून, तब्बल १४०० कोटी मेसेजेस ३१ डिसेंबरच्या रात्री व्हॉट्सऍपवरून पाठविले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

जगभरात व्हॉट्सऍपचा सर्वाधिक वापर होताना दिसत असून भारतीय नेटिझन्सनी यंदा नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचे मेसेजेस पाठविण्यासाठी व्हॉट्सऍपला सर्वाधिक पसंती दिली. व्हॉट्सऍप कंपनीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हॉट्सऍपमध्ये नेटिझन्सची गरज ओळखून सातत्याने बदल केले गेल्यामुळेच जगभरात व्हॉट्सऍपला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. यापुढेही वेगवेगळे बदल केले जाणार आहेत. भारतातून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेसेजेस एका दिवसात पाठविले गेले आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री चौदाशे कोटी मेसेजेस बरोबरच ३१० कोटी इमेजेस, ७० कोटी जिफ इमेजेस व ६१ कोटी व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत. शिवाय, व्हाइस मेसेजचाही मोठ्या प्रमाणात वापर केले गेला आहे.

Leave a Comment