१०५ वर्षाच्या आजोबांची विश्व विक्रमाला गवसणी


फ्रांस : सायकलिंगमध्ये नवा विक्रम शंभरी ओलांडलेल्या आजोबांनी प्रस्थापित असून २२.५ किलोमीटरचे अंतर एका तासात पूर्ण करून रॉबर्ट मर्चंड या १०५ वर्षाच्या व्यक्तीने नवा विक्रम रचला आहे. फ्रांसमध्ये रॉबर्ट हे अत्यंत प्रसिध्द सायकलपटू असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया संख्येने फ्रेंच नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे होते. त्यांनी १४व्या वर्षी सायकल चालवायला सुरूवात केली. मात्र ६७व्या वर्षापासून सायकलिंगवर प्रचंड मेहनत घ्यायला सुरूवात केली.