छत्तीसगडमध्ये दोन दिवसांत उद्योगांसाठी जमीन मिळणार


छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडकडे गुंतवणुकदारांनी आकर्षित व्हावे यासाठी उद्योग सुरू करणार्‍या इच्छुकांना दोन दिवसांत उद्योगासाठी जागा दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन आवेदन केल्यावर दुसर्‍याच दिवशी त्यांना जागा मिळणार आहे. यामुळे व्यवसाय लवकरात लवकर सुरू क रण्यास मदत मिळेल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

राज्यात ६ हजार हेक्टरची जमीन बँक बनविली जात आहे. गुंतवणुकदारांसाठी छत्तीसगढ योग्य व सुरक्षित राज्य आहे असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, नक्षल्यांचा राज्यातील प्रभाव आता संपला आहे. दक्षिण भागात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रूग्णालये अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. राज्याची २४ हजार मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता आहे व ती सध्याच्या मागणीच्या पाचपट आहे. २०२० पर्यत ही मर्यादा वाढवून ३५ हजार मेगावॉटवर नेली जाणार आहे. तसेच ३७ हजार किमीचे रस्तेही बांधून तयार होत आहेत त्यात ३ ते वर्षात आणखी ९ हजार किमी रस्त्यांची भर पडेल.

Leave a Comment