कुत्र्यांनाही मिळते पोस्ट ग्रॅज्युएट पदवी


माणसे शिक्षण घेऊन विविध पदव्या मिळवितात हे आपल्या नित्य परिचयाचे आहे. मात्र कुत्र्यांनाही पदव्या दिल्या जातात हे कदाचित आपण ऐकले नसेल. अर्थात त्यासाठी माणसाप्रमाणेच कुत्र्यांनाही परिक्षा पास करावी लागते व या परिक्षांची सातवी लेव्हल पास करणार्‍या कुत्र्यांना पोस्ट ग्रॅज्युएट पदवी दिली जाते. देशभरात होणार्‍या डॉग शो चॅपियनशीप मध्ये भाग घेऊन कुत्री या परिक्षा देतात. परिक्षा घेणार्‍यांत भारतीयांबरोबरच विदेशी तज्ञही असतात.

देशात जमशेदपूर येथील केनल क्लब अशा पदव्या मिळविणार्‍या कुत्र्यांचा सर्वात मोठा क्लब आहे. दरवर्षी येथून अनेक कुत्री पदव्या मिळवितात त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. क्लबचे सचिव आर.के सिन्हा म्हणाले, डॉग शो चँपियनशीपमध्ये सहभागी होणार्‍या कुत्र्यांना आम्ही विशेष प्रशिक्षण देतो. यात सी १ पासून सी ७ अशा लेव्हल असतात. सी १ ही एन्ट्री लेव्हल असते. सी २ ही ज्युनिअर, सी ३ सेकंडरी, सी ४ हायर सेकंडरी, सी ५ ग्रॅज्यूएट, सी ६ पोस्ट ग्रॅज्युएट व सी ७ ही पदवी सर्वोच्य असून त्यांना कंपॅनियन डॉग म्हटले जाते. केनेल क्लबमधून अशा २२ कुत्र्यांनी पदव्या घेतल्या आहेत.

कंपेनिअर डॉग ठरलेल्या कुत्र्यांना बाजारात प्रचंड मागणी असते. व्यावसायिक पातळीवर कुत्रे पाळणारे व्यावसायिक पैसे कमावण्यासाठी त्यांचा उपयोग करतात कारण या कुत्र्यांच्या ब्रीडसाठी मागेल ती किंमत त्यांना मिळू शकते.