नोटबंदीमुळे एथिकल हॅकर्सना बरकत


भारतात नोटबंदी लागू झाल्यानंतर पेमेंट अॅप सेवा पुरविणार्‍या तसेच ई कॉमर्स कंपन्यांकडून एथिकल हॅकर्सना प्रचंड मागणी येऊ लागली असून त्यासाठी भरभक्कम पैसे मोजायची तयारीही या कंपन्या दाखवित आहेत. नोटबंदी नंतर डिजिटल पेमेंटमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पण त्याचबरोबर पेमेंट सेवा देणार्‍या कंपन्या तसेच ई कॉमर्स कंपन्यांना सायबर सुरक्षा वाढविण्याची निकडही जाणवू लागली आहे. यामुळे या सफेद कॉलर हॅकर्सची मागणी वाढत चालली आहे.

हे हॅकर्स सॉफ्टवेअर हल्लेखोर व्हायरस पासून सुरक्षा देतात. त्यामुळे कंपनीचे लाखो रूपयांचे होणारे नुकसान वाचू शकते. फेसबुक, ट्विटर, उबेर, ड्राॅपबॉक्स यासारख्या कंपन्या अशा एथिकल हॅकर्सवर मोठा खर्च करत आहेत. अॅपमधील दोष शोधून ते सुरक्षित बनविण्यासाठी हे हॅकर्स मोलाचे सहाय्य करू शकतात. नोटबंदी नंतर आता भारतीय कंपन्याही एथिकल हॅकर्सची मदत घेण्यास पुढे सरसावल्या असून नवीन हॅकर्सनाही त्यामुळे चांगली मागणी येत आहे.

Leave a Comment