अमेरिकेतील हेल रिर्व्हेंज रोडवरचा थरार अनुभवलाय?


आजकाल पर्यटनातही अनेक प्रकार रूळले आहेत. त्यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे साहसी पर्यटन. साहसाची आवड असणार्‍यांना तसेच कांहीतरी हटके करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना त्यांची हौस भागविण्याची व भरपूर रोमांच अनुभवण्याची संधी अशा पर्यटनातून मिळत असते. जगभरात साहसी पर्यटकांसाठी अनेक जागा आहेत. अमेरिकेच्या उटाह मधल्या टाऊन ऑप मॉब येथला हेल रिव्हेंज रोड नावाचा १३ किमीचा ट्रॅक ड्रायव्हिंगचा थरार अनुभवण्यासाठी अतिशय योग्य म्हणावा लागेल.


हा धोकादायक रस्ता खास ड्रायव्हिंग थरारासाठीच आहे मात्र दुबळ्या हृदयाच्या लोकांना येथे येण्यास बंदी आहे. हा माऊंटन बायकींग व फोर व्हिलर्ससाठीचा रस्ता म्हणजे मोठमोठ्या खडकांचा समूह आहे. येथे गाड्या चालविण्यासाठी साहसाबरोबरच ड्रायव्हिंगमधील कुशलता असे दोन्ही गुण हवेत. अर्थात येथे येणारे चालक अत्याधुनिक उपकरणे सोबत बाळगूनच येतात. हे खडक ओलांडून टॉपवर केल्यानंतर निसर्गरम्य ला साल पहाड, खोल दर्‍या, कोलोरॅडो नदीचे जे दर्शन होते त्याचे वर्णन करणे अशक्य. येथे अन्य ट्रॅकही आहेत. हे ट्रॅकही अडथळ्यानी परिपूर्ण आहेत. या अडथळ्यांना मजेशीर नांवे दिली गेली आहेत. उदाहरणार्थ एक्सलरेटर, ब्लॅक होल, ओव्हर ब्रिज, चॅलेंज अशी ही नांवे आहेत.

Leave a Comment