२ वर्षांच्या चिमुकल्याचे 'बंधू प्रेम' - Majha Paper

२ वर्षांच्या चिमुकल्याचे ‘बंधू प्रेम’


ओरेम (उटाह) : एका दोन वर्षांच्या चिमुकल्याने खेळता खेळता ओढवलेल्या संकटातून प्रयत्नांची पराकाष्टा करीत आपल्या जुळ्या भावाचा जीव वाचवला. सोशल मीडियावर त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ जगभरात आश्चर्य आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

कॅमेरामध्ये कैद झालेला दोनच मिनिटांचा अमेरिकेतील ओरेम येथील हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. मात्र, भावाचे प्राण त्या चिमुकल्याने शक्कल लढवून वाचविल्याचे पाहून बघणारेही सुटकेचा निश्वास टाकतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर या मुलांचे वडील रिकी शॉफ यांनी शेअर केला आहे. ते दोघेही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका ड्रेसर टेबलवर दोन चिमुकले भाऊ चढण्याच्या प्रयत्न करीत असताना हा टेबल सरकून त्यांच्या अंगावर पडतो. एक भाऊ टेबलच्या खालून बाहेर निघतो, परंतु दुसरा टेबलखालीच अडकतो… आपला भाऊ अडकून पडल्यामुळे रडत न बसता दुसऱ्या जुळ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी केलेली ही धडपड नक्की पाहा.

Leave a Comment