लेईकोने आणल्या अँड्राईड स्मार्ट सायकली


स्मार्टफोन उत्पादन कंपनी लेईको ने दोन स्मार्ट रोड बाईक सादर केल्या असून या सायकली अँड्राईड मार्शमेलो वर आधारीत बाईक ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहेत. दोन्हीतली एक रोड बाईक आहे तर दुसरी माऊंटन बाईक आहे. दोन्ही सायकलींना टचस्क्रीन डिस्प्ले दिला गेला आहे.

माऊंटन सायकलीसाठी स्मार्ट नेव्हीगेशनसह कस्टम बाईक ऑपरेटिंग सिस्टीम दिली गेली आहे तसेच सायकलींग करताना जोडीदार शोधायचा असेल तर त्यासाठी वेगळे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. जवळच कुणी सायकल स्वार असेल तर त्याची माहिती यामुळे मिळू शकणार आहे. या सायकलींना ६ हजार एमएएच बॅटरी दिली गेली आहे. दोन्ही मॉडेल्सासाठी ४ इंची टचस्क्रीन, जीपीएस, एक्सलरोमीटर, कंपास, बॅरोमीटर, लाईट लेव्हल, व्हील स्पीड याच्यासाठी सेन्सर दिले गेले असून ही सर्व उपकरणे वॉटरप्रूफ आहेत. या सायकली २०१७ च्या दुसर्‍या तिमाहीत उत्तर अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Leave a Comment