राजधानी एक्सप्रेस पेक्षा कमी एअर इंडियाचे भाडे


नवी दिल्ली – विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आनंदाची बातमी असून लवकरच सरकारी विमानन कंपनी एअर इंडिया राजधानी एक्सप्रेस पेक्षा कमी भाड्यात प्रवास करण्याची संधी देत आहे. एअर इंडियाची ही ऑफर फक्त राजधानी एक्सप्रेस ज्या मार्गावर धावते त्याच मार्गावर उपलब्ध असणार आहे.

एअर इंडियाची ही ऑफर शुक्रवारपासून सुरु होणार असून ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. पण यासाठी तुम्हाला २० दिवस अगोदर तुमचे तिकीट बुक करावे लागणार आहे. या तिकिटांचे बुकिंग एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईट, कार्यालय आणि ट्रव्हल एजंटयांच्याकडे बुक करू शकता.

या ऑफरनुसार मुंबई ते दिल्लीचे भाडे २४०१ रुपये असणार आहे. राजधानी एक्सप्रेसमध्ये एवढ्याच अंतरासाठी एसी ३चे भाडे २५९५रु., एसी २चे भाडे ३८६० आणि फर्स्ट क्लासचे तिकीट ४७५५ रुपये आहे.

Leave a Comment