भारतीय भाज्यांवरील बंदी युरोपीय समुदायाने उठवली


मुंबई: भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी युरोपीय समुदायाने घातलेली बंदी उठविली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

युरोपीय समुदायाने आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूच्या आयातीवर काही अपायकारक घटकांमुळे बंदी घातली होती. यामुळे भारतीय भाज्यांसाठी युरोपची कवाडे पुन्हा खुली झाली आहेत. तब्बल ३ वर्षांपासून शेतकरी आणि निर्यातदारांना या बंदीमुळे मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा व्यापाराचे दार खुले झाले आहे.

कृषी मंत्रालयातील अधिकारी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादाला उपस्थित होते. अरोरा यांनी या परिसंवादात युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या भाज्यांवरील बंदी उठविली असून, याबबतचे पत्र कृषी मंत्रालयाला मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर युरोपीय समुदायाने मे २०१४मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. यात आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूचा समावेश होता. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते. या निर्णयामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.

Leave a Comment