कायमचे बंद होणार व्हॉट्सअॅप, पण…


जगभरातील अबालवृद्धांच्या संवादाचे प्रभावी माध्यम ठरलेलेले लाडके व्हॉट्सअॅप आता कायमचे बंद होणार असून व्हॉट्सअॅपने एंड्रॉईड २.२ फ्रोयो, एंड्रॉईडचे जुने व्हर्जन असलेले स्मार्टफोन यांच्यासह आयफोन ३ जीएस, आयओएस ६ आणि त्याहीपेक्षा कमी ओएस असलेल्या स्मार्टफोनमध्ये काम करणे बंद केले आहे. आयओएस ६ आणि त्यांच्यापेक्षा कमी आयओएस असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आता चालत नाही. एण्ड्रॉईड २.२ फ्रोयोवर ०.१ टक्के डिवाईस आणि आयओएस ६ वर २.६ टक्के आयफोन ३ जीएस सात वर्षापूर्वीचे आहेत. तर विंडोज ७ यूजरही आता व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाहीत.

फेसबुकचा मालकीहक्क असलेली कंपनी व्हॉट्सअॅपने सल्ला दिला आहे की, जे लोक आपल्या मित्रपरीवारासोबत चॅटींग करू इच्छितात त्यांनी आपला फोन नव्याने अपग्रेड करणे गरजेचे असून सुरूवातीच्या काळात व्हॉट्सअॅप ब्लॅकबेरी स्मार्टफोन आणि काही नोकीया हॅंडसेटमध्येही सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये कंपनीने वापरकर्त्यांसाठी ३० जून २०१७ पर्यंत व्हाट्सएप सपोर्ट वाढविण्याची घोषणा केली होती. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहीले आहे की, ब्लॅकबेरी १०, नोकीया एस ४० आणि नोकिया सिंबियन एस ६० साठी आम्ही ३० जून २०१७ पर्यंत सपोर्ट वाढवत आहे.

Leave a Comment