४जी ग्राहकांना १ वर्ष मोफत डेटा देणार एअरटेल


नवी दिल्ली: रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलने ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली असून ४ डिसेंबरपासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ९००० हजार रूपये किंमतीचा डेटा एअरटेल त्या ग्राहकांना मोफत देणार जे त्यांच्या नंबर ४जी मध्ये स्विच करतील. या ऑफरनुसार एअरटेल खासकरून प्रिपेड आणि पोस्टपेड प्लान्सवर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत प्रत्येक महिन्यात ३जीबी ४जी डेटा मोफत देणार आहे.

एअरटेलकडून सांगण्यात आले आहे की, ४ डिसेंबरपासून २५ फेब्रुवारी दरम्यान या ऑफरचा फायदा घेण्यासाठी एअरटेल ४जी नेटवर्क स्विच झाले पाहिजे. दरम्यान, रिलायंस जिओने आपल्या फ्रि ऑफरची मुदत तीन महिने आणखी वाढवली आहे. त्यानुसार ही ऑफर मार्च २०१७ पर्यंत उपभोगता येणार आहे. जिओ ‘हॅप्पी न्यू इअर’ ऑफर अंतर्गत ग्राहकांना रोज १जीबी ४जी डेटा यासोबतच सर्व अ‍ॅप्सचा मोफत वापर करू देणार आहे.

४जी मोबाईल हॅंडसेट असणारे ग्राहक एअरटेलचा फायदा तेव्हाच घेऊ शकतात जेव्हा ते एअरटेल नेटवर्कशी जुळले असतील. म्हणजे जर तुम्ही तुमच्या ४जी हॅंडसेटमध्ये एअरटेलचे कोणतही २जी, ३जी आणि ४जी सीम वापरत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी नाही. ही ऑफर घेण्यासाठी तुम्हाला नवीन ४जी हॅंडसेट घ्यावा लागणार आहे. ज्यांच्याकडे ४जी हॅंडसेट नाही ते नवीन ४जी हॅंडसेट खरेदी करून या ऑफरचा आनंद घेऊ शकतात.

Leave a Comment