नववर्षात जन्मलेली लंडनमधील पहिली कन्या भारतीय वंशाची


नवीन वर्ष सुरू होऊन १ निमिट होताच म्हणजे १२.०१ मिनिटांनी जन्मलेले लंडनमधील पहिले बाळ म्हणून भारतीय वंशाच्या भारतीदेवी यांच्या एलिनाकुमारी हिची नोंद झाली आहे. ३५ वर्षीय भारतीकुमारी यांचे हे दुसरे अपत्य असून त्यांना पहिला दोन वर्षांचा मुलगा आहे.

भारतीदेवी ३१ डिसेंबरला बर्मिंहॅमच्या सिटी हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठी दाखल झाल्या होत्या. त्यानी ठीक १२ वाजून १ निनिटांनी एका सृदृढ बालिकेला जन्म दिला असून तिचे नामकरण एलिना कुमारी असे केले गेले आहे. भारतीकुमारी म्हणाल्या आमच्यासाठी नववर्षात आमच्या बाळाने सर्वप्रथम जन्म घेतला याचा आनंद आहेच पण तिच्यासाठीही ही विशेष वेळ आहे. ती मोठी झाली की ही जन्मतारीख आणि वेळ तिच्यासाठी नक्कीच स्पेशल बनेल.