जगातील सर्वात वयोवृद्धाने साजरा केला १४६वा वाढदिवस


जर्काता – जगातील सर्वात वयोवृद्धा माणसाने ३१ डिसेंबरला आपला १४६वा वाढदिवस साजरा केला. इंडोनेशियातील रहिवासी उसियम बहगोतो जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असून येथील सरकारने दिलेल्या ओळखपत्रानुसार उसियम बहगोतो यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७० साली झाला. त्याचमुळे उसियम बहगोतो यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

ऐवढी वर्ष आयुष्य जगल्यानंतर आता उसियम बहगोतो यांना अजून जगणे नको आहे. कारण त्यांना ऐकणे आणि बघण्यास त्रास होत आहे. इंडोनेशियातील एका छोट्या गावात उसियम बहगोतो यांची तीन लग्न झाली असून त्यांच्या तिन्ही पत्नी आणि मुलांचे निधन झाले आहे. ते आता आपल्या नातवंडांसहित राहतात.