आली टाटाची जेनॉन योद्धा


नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच सप्ताहात टाटा मोटर्सने नवीन गाडी भारतीय बाजारात सादर केली असून अलीकडेच नियुक्त केलेला सदिच्छादूत अक्षय कुमार याच्या उपस्थितीत पिकअप वाहन जेनॉन योद्धा बाजारात आणल्याची घोषणा कंपनीने केली. ही नवीन गाडी सिंगल कॅप आणि डबल कॅप अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असून या गाडीची किंमत ६.०५ लाखापासून सुरू होते.

तीन डिझेल इंजिनांचा वापर या गाडीत करण्यात आला असून ती बीएस-३ आणि बीएस-४ या पर्यावरण मानकांची पूर्तता करतात. याचबरोबर १४५ बीएचपी क्षमतेसोबत ३२० एनएमचा टॉर्क देतात. या गाडीचे दमदार इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनयुक्त आहे, असे कंपनीने सांगितले. गाडीमध्ये ऍडजस्टेबल स्टीअरिंगचा वापर करण्यात आला असून ती १२५० किलोगॅमपर्यंत वजन उचलू शकते. भविष्यातील परिवहन वाहनांचा विचार करत ही गाडी डिझाईन करण्यात आले असे कंपनीने म्हटले.