टाळी वाजवताच जागेवर जाणार्‍या बुद्धिमान खुर्च्या


घरात असो वा ऑफिसमध्ये असो, या ना त्या कारणाने खुर्च्यांची जागा सतत बदलावी लागते. अशा वेळी या खुर्च्या उचलून एकीकडून दुसरीकडे न्याव्या लागतात. घरातील समारंभ, कार्यालयातील बैठका अशा वेळी तर खुर्च्यांची हलवाहलव सारखीच करावी लागते. या हलवाहलवीच्या कामाचा कंटाळा असणार्‍यांसाठी एक खूषखबरी आहे. निस्सान कंपनीने हाताची टाळी वाजवताच तुम्हाला हव्या त्या जागी आपोआप जाऊन थांबणार्‍या खुर्च्या बाजारात आणल्या आहेत. विशेष म्हणजे यामुळे एक एक खुर्ची उचलण्याचे झंझटही संपणार आहे.

या खुर्च्यांना इलेक्ट्रॅानिक इंटेलिजन्ट चेअस© असे नांव दिले गेले आहे. तुम्ही एक टाळी वाजवलीत की या खुर्च्या तुम्हाला हव्या त्या जागी आपणहूनच जातील व तेथे थांबतील. यात कंपनीने इंटेलिजन्ट पार्किंग असिस्ट या तंत्रज्ञानाचा वापर केला असून निस्सान हे तंत्रज्ञान त्यांच्या कार्समध्ये वापरते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार आपली आपणच ठराविक जागी पार्क होते.

Leave a Comment