आयसीआयसीआय सह अनेक बँकांची कर्ज व्याजदर कपात


सोमवारी आयसीआयसीआय सह खासगी क्षेत्रातील दोन तर सरकारी क्षेत्रातील तीन बँकांनी त्यांच्या कर्ज व्याज दरात कपात केल्याची घोषणा केली आहे. रविवारी स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक व युनियन बँकेनेही त्यांचे कर्जव्याजदर ०.९० टक्यांनी कमी केल्याची घोषणा केली होती. नोटबंदी नंतर बँकात जमा झालेल्या प्रचंड पैसा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी बँकांनी कर्ज व्याज दरात कपात करण्याचे आवाहन बँकींग क्षेत्राला केले होते त्याला बँकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आयसीआयसीआयने त्यांचे कर्जव्याजदर ०.८८ टक्यांनी कमी करून १ वर्ष मुदतीसाठी ८.२० टक्क्यांवर आणला आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने हा दर ८.६० टक्के तर देना व आंध्र बँकांनी हा दर ८.५५ टक्के केला आहे. हे व्याजदर ३ जानेवारीपासून लागू झाले आहेत. कोटक महिद्रानेही त्यांच्या व्याजदर ९ टक्कयांवर आणला असून तो १ जानेवारीपासून लागू झाला आहे.

Leave a Comment