रॉयल एनफील्डने आणले क्लासिक ३५०चे नवे एडिशन


आपल्या फॅन्ससाठी नवीन वर्षाचे एक अनोखे गिफ्ट फेमस बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने आणले असून रॉयल एनफील्डने आपल्या लोकप्रिय मॉडल क्लासिक–३५० ची रीडिच (Redditch)ची सीरिज लाँच केली आहे. १.४६ लाख रुपये या नव्या मॉडेलची किंमत आहे. कंपनीने सांगितले आहे की, या सीरीजच्या मोटरसायकल ५० च्या दशकात असलेल्या रॉयल एनफील्डच्या मोटारसायकलच्या रंग आणि इतर गोष्टींनी प्रेरित होऊन केलेली असून पहिल्यापासून असलेल्या कलर्सनंतर आता रॉयल एनफिल्ड रीडिच रेड, रीडिच ग्रीन आणि रीडिच ब्लू कलरमध्ये देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही पेंट स्कीम ५० च्या दशकात रॉयल एनफील्ड मोटारसायकलने तयार केलेली आहे. रीडिच यूकेमधील एक शहर आहे. जिथे रॉयल एनफील्डचा जन्म झाला आहे.

Leave a Comment