आतापर्यंतची सर्वात शानदार आणि स्वस्त जिप्सी घेऊन आली सुझुकी


लवकरच भारतीय बाजारात एक शानदार स्टायलिश जिप्सी/जिम्नी कार सुझुकी ही लोकप्रिय कंपनी लॉन्च करणार असून सुझुकीची सर्वात स्पेशल कार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुझुकी जिप्सी ही कार १.२ लीटर पेट्रोल इंजिनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. तर बाकी देशांमध्ये ही कार ६५८cc च्या टर्बोचार्ज्ड इंजिनसोब्त लॉन्च होऊ शकते.

२०१७ च्या शेवटच्या महिन्यात भारतात ही जिप्सी कार येण्याची शक्यता आहे. १.२ लीटर पेट्रोल इंजिनसोबतच भारतात १.० लीटर बूस्टर जेट इंजिनसोबतही ही कार लॉन्च होऊ शकते. सुझुकीने नुकतीच त्यांची एक्स लॅंडर कॉन्सेप्ट कार सादर केली. आता कंपनी भारतात या कारला सुझुकी जिम्नी किंवा मारूती जिप्सी या नावाने बाजारात आणू शकते.

भारतात या कारला ऑल व्हिल ड्राईव्ह ऑप्शन आणि हलक्या बॉडीसोबत लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाणार आहे. या कारला डायनामिक ड्राईव्ह देण्यासाठी आणि फ्य़ूल एफिशिएंट बनवण्यावर कंपनी आता काम करत आहे. जिप्सीला बजट सेक्शनमध्ये आणले जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बेस मॉडेलची किंमत ५ लाख रूपये तर टॉप मॉडेलची किंमत ८ लाख रुपये असू शकते. X-Lander बेस्ड या कारवर आधारित जिप्सीचा लूक परदेशात विकल्या जाणा-या लक्झरी कार्ससारखा असणार आहे. या कारमध्ये दोन डोअर असणार आहेत.

Leave a Comment