संपली डेबिट कार्डवरची सवलत


मुंबई: सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांना गती मिळण्यासाठी डेबिट कार्डने व्यवहार केल्यास सर्व करामध्ये सवलत जाहीर केली होती. या सवलतीची मुदत संपल्यामुळे तुम्ही जर डेबिट कार्ड वापरून व्यवहार करत असाल तर, या व्यवहारांसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार असून एटीएमच्या व्यवहारावर सेवा कराचे नियम लागू नसतील.

दरम्यान, डेबिट कार्डच्या वापरावरील सेवा करावर देण्यात आलेली सवलत मात्र अद्याप कायम असून डेबिट कार्डच्या व्यवहारांवर लावण्यात आलेले सेवा करही सध्या सवलतीच्या दरात सुरू आहेत. हा सवलत दर ३१ मार्च २०१७ पर्यंत लागू राहणार आहे. ३१ मार्च २०१७ नंतर हे सेवा दर बदलले जातील व पूर्ववत होतील. दरम्यान, सध्या सवलतीच्या दरात सुरू असलेल्या सेवा दरानुसार उदा. तुम्ही जर १ हजार रुपयांचा व्यवहार केला तर तुम्हाला २.५ रूपये पैसे (अडीच रूपये) एवढा सेवा कर लागेल. तर, हजार ते २ हजार रुपयांच्या व्यवहारावर जास्तीत जास्त ५० पैसे सेवा कर द्यावा लागेल. म्हणजेच दोन हजार रुपयांच्या व्यवहारावर १० रुपये सर्व्हिस चार्ज लागेल. हे दर ३१ मार्च २०१७ पर्यंत लागू राहणार आहेत.

Leave a Comment