भूतानचा युवराज पूर्वजन्मात नालंदाचा विद्यार्थी?


भूतानचा तीन वर्षांचा युवराज जिग्मी आंगचूक त्याची आजी राजमाता दोजी आंगचुक आई सोमत देझेन यांच्या सोबत सध्या बिहारमध्ये आला असून येथील प्राचीन नालंदा विद्यापीठातील भग्नावशेषांची पाहणी करत आहे. राजमाता दोजी यांच्या म्हणण्यानुसार जिग्मी १ वर्षाचा असल्यापासून नालंदातील अनेक आठवणी सांगत असून त्याच्याकडून मिळत असलेल्या माहितीनुसार तो या प्राचीन विद्यापीठात पूर्वजन्मी विरोचन नावाचा विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होता.

राजमातांच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्या नातवाला घेऊन नालंदाचे भग्नावशेष पाहायला आल्या तेव्हा हा तीन वर्षांचा नातू वेगळ्याच हालचाली करू लागला व त्याने तेथे खूप शोधाशोध करून तो पूर्वजन्मात ज्या खोलात राहात होता त्याचे भग्नावशेष शेाधून काढले. तेथील अन्य बांधकामांसंदर्भातली माहितीही त्याने सांगितली. इसवीसन पूर्व आठव्या शतकात बौद्धकाळात तो नालंदामध्ये शिकत होता व या नालंदाचे वर्णन त्याने भूतानमध्ये असताना व नालंदा प्रत्यक्ष न पाहताच केले होते. स्तूपासह अनेक गोष्टींची माहिती तो त्यावेळी सांगत होता. तो वर्णन करत असलेला एक रस्ता व उंच जागाही त्याने येथे आल्यावर शोधली असेही समजते.

Leave a Comment