ब्लॅकबेरीचा शेवटचा स्मार्टफोन जानेवारीत लाँच


ब्लॅकबेरी त्यांच्या क्वार्टी कीबोर्डच्या शेवटच्या स्मार्टफोनवर अंतिम हात फिरवित असून हा फोन डीटीईके ७० अथवा मरक्युरी या नावाने जानेवारी मध्ये होत असलेल्या सीईएस २०१७ मध्ये सादर करणार असल्याचे वृत्त आहे. या फोनसंदर्भात कांही माहिती लीक झाली असून त्याचे कांही फोटोही लिक झाले आहेत.

वेबसाईटवरून मिळत असलेल्या माहितीनुसार या फोनला स्पेस बारवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. हा फोन अँड्राईड नगेट ७.० वर रन होईल असेही संकेत मिळत आहेत. या फोनसाठी ४.७ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, १८ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल. या फोननंतर ब्लॅकबेरी स्वतःचा स्मार्टफोन तयार करणार नाही असे कंपनीने जाहीर केले आहे. या नंतरचे फोन ब्लॅकबेरीच्या नावाने तयार करण्यासाठी अन्य कंपन्यांना परवाने दिले जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment