पेट्रोल, डिझेल दरवाढीची सोशल मीडियावर खिल्ली


नवी दिल्ली – सर्वसामान्य जनतेच्या नववर्षाच्या आनंदावर सरकारवरने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे विरझन घातले असून नववर्षातच पेट्रोल प्रतिलिटर १.२९ पैसे तर डिझेलचे दर ९७ पैशांनी वाढले आहेत. सोशल मीडियावर या निर्णयाच्याविरोधात जोरदार टीका होत असून सरकारची खिल्ली उडवली जाते आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पंधरा दिवसांपूर्वीही वाढ करण्यात आली होती. पेट्रोल प्रतिलिटर २.२१ रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर १.७९ रुपयांनी महागले होते. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या पेट्रोल हॅशटॅग ट्रेंण्ड करताना दिसत आहे. दरवाढीमुळे ट्विटरवर सरकारच्या निर्णयाच्या विरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाची खिल्ली देखील उडवली जात आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे. त्यानुसार सरकार जनतेला कॅशलेसकडून कारलेसकडे घेऊन जाणार असे मत एकाने व्यक्त केले. तर काहींनी मोदींचे नेतृत्व देशासाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीने त्रस्त असणाऱ्या जनतेला सरकारने पेट्रोल दरवाढीचे भेट दिल्याचे देखील ट्विट एकाने केले आहे.

Leave a Comment