चीनमधील चमकत्या गुलाबांची बाग


चीनच्या हुबई प्रांतातील वुआन शहरात गुलाबाची एक वैशिष्ठपूर्ण बाग तयार केली गेली आहे. गुलाब म्हटले की ते सुंदर असतातच पण या बागेतील गुलाब विशेष सुंदर आहेत कारण हे एलईडी गुलाब आहेत. महणजे एलईडी लाईट लावले गेलेले हे गुलाब पांढरे शुभ्र आणि चमकदार आहेत. या बगिच्यात असे तब्बल ५२ हजार गुलाब आहेत. या बगीच्यामुळे तरूण कपल्सना रोमान्स करण्यासाठी व एकमेकांसोबत कांही वेळ आनंदात घालविण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. याचबरोबर पर्यटकांसाठीही हे मोठे आकर्षण ठरले आहे.


दक्षिण कोरियातील एका कंपनीत हे एलईडी गुलाब तयार केले गेले आहेत. ते लावण्यासाठी तीन वर्षे काम सुरू होते. २८७ हेक्टर जागेत हे गुलाब लावले गेले आहेत. यापूर्वी या गुलाब बागेचे शो हाँगकाँग व सेऊल येथेही केले गेले आहेत. मात्र चीनमधील बाग ही प्रचंड मोठी आहे. या बागेत आल्यानंतर आपण स्वर्गात तर नाही ना असा भास होतो.

Leave a Comment