हा रोबो चालतो तेव्हा जमीनही हादरते…


सुपरस्टार रजनीकांत याच्या रोबोट या चित्रपटाची आठवण करून देणारा आणि हुबेहूब माणसासारखा दिसणारा रोबो दक्षिण कोरियामध्ये बनवण्यात आला आहे. हा रोबो चालतो तेव्हा जमीनही थरथरते.

दक्षिण कोरियाची रोबोटिक कंपनी हानकूक मिराये टेक्नोलॉजीच्या म्हणण्यानुसार, “आमचा रोबो जगातील पहिला मॅन्ड् बायपॅडल रोबो आहे. अत्यंत धोकादायक परिस्थितीत, जेथे माणूस जाऊ शकत नाहीत तेथे, करण्याकरिता तो बनवला आहे. ”

माणसासारखा दिसणारे हे यंत्र 13 फूट उंच आहे. या रोबोचे वजन 1.5 टन आहे. याच्या केवळ एका हाताचे वजन 130 किलोग्रॅम आहे. या रोबोच्या आत एक कॅबिन बनविले गेले आहे. यात एक माणूस बसून रोबो चालवू शकतो.

हॉलीवुडच्या आयर्नमॅन आणि अवतार यांसारख्या चित्रपटांची आठवण या रोबोला पाहून येते. सध्या या रोबोला आणखी चांगले बनविण्याचा प्रयत्न चालू आहे. “हा रोबो सध्या केवळ एक वर्षाचा आहे. त्यामुळे तो मुलांसारखी पावले टाकत आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment