रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या बाईक्सचे थरारक रेसिंग


रेसिग ट्रॅकवर तुफान वेगाने धावणार्‍या कार्स अथवा बाईक्स प्रत्यक्षात अथवा टिव्हीवर अनेकांनी पाहिल्या असतील. या वाहनांच्या चालकांचे कारनामे आपल्याला थक्क करून सोडतात. या रेसिग इतकेच थरारक व रोमाचंक रेसिंगचे अ्रनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर धमाकूळ घालत आहेत मात्र हे रेसिंग खर्‍याखुर्‍या बाईक्सचे नाही तर रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या वेगवान छोट्या बाईक्सचे आहेत. याला आरसी बाईक रेसिंग असे म्हटले जाते व हे रेसिंगही झपाट्याने लोकप्रिय होत आहे.


या रेसिंगसाठी खर्‍याखुर्‍या रेसिंग ट्रॅकसारखाच पण छोटा ट्रॅक तयार केला जातो. वेडीवाकडी, शार्प वळणे, खडबडीत रस्ते, गवताचे र्पचेस अशी अनेक आव्हाने येथेही असतात. या ट्रॅकच्या चारी बाजूंनी पॅव्हिलियनमध्ये प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केली जाते तर विशेष मंचावर बाईक कंट्रोल करणारे ऑपरेटर खेळाडू असतात. या बाईक छोट्या दिसल्या तरी त्यांचा वेग, बॅलन्सिंग व आवाज खर्‍या बाईक्ससारखाच असतो. तीव्र वळणांवर जमिनीशी समांतर होऊन जाणे पुन्हा सरळ होऊन वेग घेणे व पुढच्या टर्नसाठी तयार होणे असा खर्‍या रेसिंगसारखा रोमांच येथेही अनुभवता येतो.यातही जय, पराजय व बाईक दुर्घटनाग्रस्त होणे असे सर्व प्रकार असतात.

Leave a Comment