मोबाईल वॉलेट बाजार १९० टक्कयांनी वाढणार


भारतात नोटबंदी केली गेल्यानंतर डिजिटल ट्रान्झॅक्शनचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असतानाच असोचेम व कॉमर्स सर्वेक्षण कंपनी आरएनसीओएस यांनी संयुक्त रित्या केलेल्या एका सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यानुसर २०२२ पर्यत भारतात मोबाईल वॉलेटचा बाजार १९० टक्यांनी वाढेल असे संकेत मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आज हा बाजार दीड अब्ज रूपयाचा असून तो या काळात १५१२ अब्जांवर जाईल असे मत यात व्यक्त केले गेले आहे.

स्मार्टफोनचा वाढता वापर, मोबाईल इंटरनेट युजरची वाढती संख्या व ई व्यवसायाचा होत असलेला विकास तसेच वाढती कमाई या सार्‍यांचा परिणाम मोबाईल वॉलेट बाजार विकासासाठी हातभार लावत आहे. त्याला नोटबंदीचाही फायदा मिळतो आहे. सध्या मोबाईलच्या माध्यमातून होत असलेल्या व्यवहारांचा हिस्सा २० टक्क्यांवर पोहोचला असल्याचे असोचेमचे महासचिव जी.एस. रावत यांनी सांगितले. ते म्हणाले हा हिस्सा नजीकच्या काळात ५७ टक्कयांवर जाईल असे संकेत मिळत आहेत. एम वॉलेट या नावानेच हे सर्वेक्षण केले गेले होते.

Leave a Comment