उद्यापासून एटीएममधून मिळणार ४५०० रुपये


नवी दिल्ली – नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकारने सर्वसामान्यांना नववर्षात सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरबीआयने उद्यापासून सुरू होणार्‍या नवीन वर्षात एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली आहे. 1 जानेवारीपासून आपण एटीएममधून साडे चार हजार रुपये काढू शकणार आहात. 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सरकारने एटीएममधून अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा घातली होती. दरम्यान, एका आठवड्यात बँक किंवा एटीएममधून जास्तीत जास्त 24,000 हजार रुपयेच काढता येणार आहे. या निर्णयात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Leave a Comment