आग्रा येथे आहे आणखीही एक ताजमहाल


जगातील सात आर्श्चयात समावेश असलेला ताजमहाल जगातील पर्यटकांसाठी आजही मोठे आकर्षण आहे. याच आग्रयात २१३ वर्षांपूर्वी बांधला गेलेला आणखीही ही ताजमहाल आहे याची मात्र फारच थोड्यांना माहिती आहे. मूळच्या ताजमहालापासून थोडा दूर ख्रिश्चन कब्रस्तानात हा लाल ताजमहाल एका इंग्लीश बाईंनी त्यांच्या नवर्‍याच्या म्हणजे कर्नल जॉन विलियम याच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून बांधला होता असे समजते.

या लाल ताजमहालाला बेबी ताज म्हणून ओळखले जाते. सध्या या इमारतीची देखभाल पुरातत्त्व विभागाकडे आहे. जॉन विलीयम हॅसिंग हा श्रीलंकेल लष्करी आयुष्य जगत होता. १७६५च्या कँडी युद्धात त्याचा सहभाग होता. त्यानंतर तो हैद्राबादच्या निजामाच्या पदरी होता व १७८४ मध्ये महादजी शिंदे यांच्या सेनेत भरती झाला होता. महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर तो आग्रा येथे गेला व तेथेच १८०३ साली त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या बायकोने ताजमहालची नक्कल असलेला हा महाल त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधला.

५८ चौरस फुटाच्या चबुतर्‍यावर हा महाल आहे. ताजमहालाप्रमाणेच त्यालाही उंच मिनार व गोलघुमटही आहे. त्यातील तहखान्यात खरी कबर आहे. इमारतीभोवती अन्य इंग्लीश आफिसर्स व त्यांच्या कुटुंबियांच्या कबरी आहेत.

Leave a Comment