मेक इन इंडियाअंतर्गत बनणार अॅपल ची उत्पादने


पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेत सहभागी होण्यासंदर्भात अॅपल गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते. भारतीय स्मार्टफोन बाजारातील आपला हिस्सा वाढविण्यासाठी आणि स्पर्धात्मक किंमतीत उत्पादने विक्रीसाठी अॅपलचे प्रयत्न सुरू असून त्याअंतर्गत त्यांच्या फोन्सचे उत्पादन भारतात करणे हा एक चांगला पर्याय कंपनीपुढे आहे. अॅपलसाठी काम करत असलेल्या तैवानी विस्ट्राॅन ने बंगलोरमध्ये उत्पादन फॅसिलीटी सेंटरचे काम सुरू केले असून येत्या एप्रिलपासून तेथे उत्पादन सुरू होईल असे सांगितले जात आहे.

आयफोन असेंब्लीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे व १ वर्षात पूर्ण उत्पादन सुरू करण्याचा प्रयत्न आहे असे कंपनीतील सूत्रांकडून समजते. सध्या भारतात आयफोन पार्ट आयात करण्यासाठी कंपनीला १२.५ टक्के आयातकर द्यावा लागतो आहे. भारतातच उत्पादन केले तर हा कर द्यावा लागणार नाही व त्यामुळे आयफोन कमी किमतीत विकणे कंपनीला परवडणारे ठरेल व भारतीय बाजारात आपले स्थान मजबूत करण्यासाठीही मदत मिळणार आहे. भारतात यापूर्वी चाकण येथे फॉक्सकॉन या अॅपलच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने फकत आयफोन उत्पादने प्रकल्पात तयार केली जाणार असल्याची घोषणा केली होती मात्र त्यांनी शाओमी व वन प्लससह स्थानिक उत्पादनांसाठीचे करारही केले असल्याने तेथे फक्त अॅपल उत्पादन होत नसल्याचेही समजते.

Leave a Comment