‘रिंगिंग बेल्स’च्या संस्थापकाचा राजीनामा


नोएडा – ‘रिंगिंग बेल्स’ या कंपनीने फक्त २५१ रुपयात स्मार्टफोन देण्याची घोषणा केल्यामुळे मोबाईल जगात गोंधळ उडाला होता. या कंपनीचे संस्थापक मोहित गोयल यांनी आता राजीनामा दिल्यामुळे फ्रीडम २५१ फोनच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मागील दोन आठवड्यापासून नोएडातील रिंगिंग बेल्सच्या कार्यालयाला कुलूप लागले आहे. त्यामुळे रिंगिंग बेल्सचे दिवाळे निघाले असल्याची चर्चा आहे. मोहित गोयल यांनी एमडी पदाचा राजीनामा देऊन एमडीएम इलेक्ट्रॉनिक्स नावाची नवी कंपनी सुरू केली असून त्यांची पत्नी धारणा यांनीही रिंगिग बेल्स ही कंपनी सोडली आहे. राजीनामा देण्याच्या निर्णयामागे कुठलेही मोठे कारण नसल्याचे मोहित गोयल यांनी स्पष्ट केले आहे. कारण काहीही असले तरी मोहित गोयल यांचा या निर्णयामुळे रिंगिंग बेल्सचे भविष्य अडचणीत आले आहे.

Leave a Comment