मोबाईलधारकांसाठी येणारे वर्ष ‘सुस्साट’


नवी दिल्ली – मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना २०१७ मध्ये ५ जी नेटवर्कची भेट मिळण्याची शक्यता असल्यामुळे मोबाईलधारकांसाठी येणारे वर्ष ‘सुस्साट’ असणार आहे. ही सेवा सुरु करण्याची चाचपणी देश आणि जगातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी सुरू केली आहे. ही सेवा लवकरच भारतात सुरू होईल, अशी दाट शक्यता आहे.

सरकारने नव्या वर्षात देशात ५ जी नेटवर्क सुरू करण्याची तयारी केल्याचे वृत्त असून ‘मिंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून ५जी नेटवर्कसाठी आवश्यक मापदंड आणि नियमावलीवर केलेल्या विचार-विनिमयसंबंधी दस्तावेज जारी होण्याची शक्यता आहे. ५ जी नेटवर्कच्या माध्यमातून ओव्हरलोड डेटा फाईलसह डिजिटल चित्रपटही कोणत्याही मर्यादेशिवाय काही सेकंदात डाऊनलोड करता येतील. ५ जीचे ग्राहक थ्रीडी चित्रपट, गेम्स, अल्ट्रा एचडी मजकूर आणि रिमोट मेडिकल सेवेचा आनंद लुटू शकतात. यासंबंधी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारीत एक वेळापत्रक दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून तयार केले जाणार आहे. देशात या नव्या तंत्रज्ञानाचा विकास कसा करता येईल, यावरही सल्लामसलत होईल, असे या वृत्तात म्हटले आहे.

Leave a Comment